1. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या अनुसूची ‘ड’ चे प्रकरण ८, नियम ४० अन्वये एकत्रित मालमत्ता करासह इतर कर संबंधितांकडून येणे आहे, ती रक्कम हे देयक प्राप्त झाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत, महानगरपालिकेकडे भरावी. अशी आपणास विनंती करण्यात येत आहे.
|
2. सदर बिलाची पूर्ण रक्कम ३१ डिसेंबर पर्यंत न भरल्यास २ % शास्ती आकारण्यात येईल व २ % शास्ती ही जोपर्यंत रक्कम पूर्ण भरत नाही तोपर्यंत प्रत्येक महिन्यासाठी पूर्ण बिलावर आकारण्यात येईल. (महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या अनुसूची ‘ड’ चे प्रकरण ८, नियम ४१ अनुसरून).
|
3. विशेष सुट : - ज्या मालमत्ता धारकांना बिलात विनिर्दिष्ट केलेली रक्कम आजपासून पुढील पाच वर्षांची आगाऊ भरायची असेल त्यांना एकत्रित चालू मागणीच्या मालमत्ता करामध्ये १५ % सुट देण्यात येईल. बिलात विनिर्दिष्ट केलेली रक्कम बिल देय दिनांकापूर्वी भरणा करावी.
|
4. हे देयक मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत देयकाची संपूर्ण रक्कम भरण्यात आली तर १ % मागणीनुसार मनपा मार्फत सवलत देण्यात येईल.
|
5. रेन वॉटर हार्वेस्टींग प्रकल्प अंमलात आणणाऱ्या मालमत्ता धारकांना मागणी नुसार मा. आयुक्त यांचे मंजुरीअंती एकत्रित मालमत्ता कराच्या २ % सवलत अनुज्ञेय असेल. तसेच प्रकल्प खर्चाच्या २० % किंवा अधिकतम रुपये १ लक्ष इतके अनुदान अनुज्ञेय राहील.
|
6. सौरउर्जेचा वापर गृहनिर्माण संस्थांच्या प्रांगणातील दिव्यांसाठी करणाऱ्या व सोलर हिटर चा वापर करणाऱ्या संस्थांसाठी मागणीनुसार मा. आयुक्त यांचे मंजुरीअंती एकत्रित मालमत्ताकराच्या २ % सवलत मिळेल. तसेच प्रकल्प खर्चाच्या २० % किंवा अधिकतम रु. १ लक्ष इतके अनुदान अनुज्ञेय राहील.
|
7. निसर्ग ऋण प्रकल्प राबवून स्वतःच्या गृह निर्माण संस्थेत कचरा निर्मुलन करणाऱ्या गृह निर्माण संस्थेस मागणीनुसार मा. आयुक्त यांचे मंजुरीअंती एकत्रित मालमत्ताकरात २ % सवलत अनुज्ञेय असेल. तसेच प्रकल्प खर्चाच्या २० % किंवा अधिकतम रु. १ लक्ष इतके अनुदान अनुज्ञेय राहील.
|
8. नियमित मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ता धारकांच्या मालमत्तांना तसेच मालमत्ता धारकांच्या कुटुंबियांना अपघाती विमा संरक्षण.
|